Advertisement

बसचा स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाच्या समयसुचकते मुळे मोठी दुर्घटना टळली

बसचा स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाच्या समयसुचकते मुळे मोठी दुर्घटना टळली

ब्रह्मपुरी

ब्रम्हपुरी नागपूर बस सकाळी सव्वा साहा वाजता ब्रह्मपुरी येथून  नागपूर साठी निघाली असता ब्रह्मपुरी – नागभीड राष्ट्रीय मार्गावरील सायगाटा जंगल परिसरात बसचा स्टेरिंग अचानक लॉक झाल्याने बस रस्त्याच्या बाजूला उतरली. वेळीच चालक जितेंद्र गायकवाड यानी समय सूचकता दाखवत, तत्परतेने प्रवाशांचा जीव वाचविला. यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु वाहक नरेंद्र गाडगीलवार याच्या पायाला किरकोळ मार लागला आहे.

सदर घटना घडण्या अगोदर एक छोटा पुल होता पुलाचे खाली जर बसचे चाक गेले असते तर बस पलटण्याची मोठी श्यक्यता होती. पण चालकाने बसला त्यापासून वाचविले व मोठी दुर्घटना टळली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या