Advertisement

कन्हान ला १५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती थाटात साजरी

कन्हान ला १५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती थाटात साजरी

कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनसंघ व शिक्षाविद्, चिन्तक चे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२१ व्या जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद नवीन इमारत येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नेहरु युवा केंद्र नागपुर चे उद्यविर सिंग , डॉ रवि गजभिए , मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .

त्यानंतर लाईफ लाईन हाॅस्पीटल ब्लड बॅंक चे पथक डॉ अविनाश बाभरे , रवि गजभिए , पायल सागरे , प्रियंका ठोमरे , दिव्या हेडाऊ, वैभव लोहकरे , विशाल घोडेस्वार यांच्या सहकार्याने एकुण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असता रक्तदात्यांना टिफीन बाॅस , फळ , निंबु शरबत व नमकीन पॅकिट वितरित करुन सत्कार करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , सुधिर भिवगडे , निलेश गाढवे , केतन भिवगडे , श्याम मस्के , प्रवीण हुड , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , हरीओम प्रकाश नारायण , सह आदि मंच पदाधिकार्यांनी , सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या