Advertisement

सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार-2022

सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार-2022

31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 18 जुलै   देशाचे ऐक्य व अखंडता या क्षेत्रात काम करणाऱ्या व याकरीता योगदान देणाऱ्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच दि. 31 ऑक्टोबर रोजी  सरदार पटेल राष्ट्रीय ऐक्य पुरस्कार-2022 हा नागरी पुरस्कार देण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या www.awards.gov.in या पोर्टलवर दि. 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पुरस्कारासाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहे.

तरी, आपल्या विभागातील किंवा अधिनस्त कार्यालयातील विशिष्ट व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, संस्था यांचे अर्ज केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावे, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या