Advertisement

शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न

शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा आयटक संलग्न  शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनची जिल्हा कार्यकारणी बैठक  संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष कॉ वनिता कुंठावार यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक राज्य महासचिव कॉ विनोद झोडगे ,कॉ राजू गईनवार माजी नगरसेवक,कॉ प्रकाश रेड्डी,रवींद्र उमाटे,श्रीधर वाढई,कल्पना रायपूरे, माया गदेवार यांच्या उपस्थितीत एम एस इ बी वर्कर्स फेडरेशन हाल चंद्रपूर येथे संपन्न झाली.

सभेमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून मानधन वाढ आणि ईतर प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संघटन मजबूत करण्याचे ठरविण्यात आले. तसेच जिल्ह्याचे अधिवेशन येत्या 3 जुलै 2022 रोजी चंद्रपूर येथील गुरू माऊली मंदिर जवळ नागाचारी महाराज मंदिर सभागृह येथे सकाळी 12 वाजता आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हाभरातील सर्व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन कॉ श्रीधर वाढई तर आभार राजू गईनवार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या