बारावी चा नुकताच निकाल लागला असता पारशिवनी तालुक्यातून कन्हान व कांद्री मधील विध्यर्थी अव्वल: कन्हान शिवसेना तर्फे दिल्या सदिच्छा शुभेच्छा
शिवसेना कन्हान शहर – जय महाराष्ट्र
कन्हान-कांद्री:- दिनांक ०८/०६/२०२२ रोजी बारावी च्या निकाल जाहीर झाला. त्यामध्ये पारशिवनी तालुक्यातून कन्हान-कांद्री येथील राहिवासी कु. जानवी सेवकराम भोंडे हिने प्रथम क्रमांक पटकावून ९०.३३ टक्के मिळवले तसेच इंदिरा नगर-कन्हान येथील रहिवासी कु. सानिका अनिल मंगर हिने द्वितीय क्रमांक पटकावून ८८.०० टक्के मिळवले. या कीर्तीला पाहता शिवसेना कन्हान शहर द्वारे.

अप्रतिम गुणवंत विद्यार्थीच्या निवास स्थानी भेट देण्यात आली. आणि विध्यार्थीनीचे व त्यांच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ तसेच झाड देवून त्यांचे स्वागत करण्यात आले
विध्यार्थीनीना मिठाई भरवून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित छोटू राणे (शिवसेना शहर प्रमुख), अनिल ठाकरे (नगरसेवक न प कन्हान-पिपरी), चिंटू वाकुडकर, हरीश तिडके, भारत पगारे, अजय चव्हाण, विनोद पात्रे, समशेर पुरवले, आणि इ. शिवसैनिक उपस्थित होते.
या भेटी करिता विध्यार्थीनीने व त्यांच्या आई वडिलांनी शिवसेना पक्षाचे आभार मानले.
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर



0 टिप्पण्या