-स्विकृत नगरसेवकपदी रमेश थोरात यांची निवड तिघांचे अर्ज अवैध-
सुरगाणा नगरपंचायत स्विकृत नगर सेवकांची निवड करण्यात आली. यामध्ये स्विकृत नगरसेवक पदासाठी अब्बास अलारखू शेख, अकिल नुरमंहमद पठाण,धर्मेंद्र पगारीया यांनी माकप व शिवसेनेची नगरपंचायतीत युती असल्याने शिवसेनेकडून तर रमेश थोरात यांनी भाजपाकडून
स्विकृत नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केले होते. यामध्ये शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेल्या तिघांचे नामांकन निवडणूक आयोगाच्या अटी व शर्तीची पुर्तता न करु शकल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आले तर भाजपतर्फे दाखल करण्यात आलेले केवळ एक नामांकन वैद्य ठरल्याने रमेश थोरात यांची भाजपतर्फे स्विकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.यावेळी छत्रपती शिबाजी चौकात फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यापुर्वी माकपतर्फे थोरात यांची स्विकृत नगरसेवक पदासाठी निवड करण्यात आली होती.तर आता भाजपतर्फे निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने जल्लोष करण्यात आला.यावेळी नगरसेवक सचिन महाले,रंजना लहरे, शोभा पिंगळे,प्रकाश वळवी,विजय कानडे, संजय पवार,शाम पवार, जाकिर शेख,राहुल पवार,ज्ञानेश्वर कराटे, विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.या निवडी बद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार,माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण,समीर चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार सचिन मुळीक,बागलाणचे प्रांत अधिकारी बबनराव काकडे यांनी काम पाहिले.
सुरगाणा प्रतिनिधी गणेश गाडेकर



0 टिप्पण्या