नरसाबाई निवासी अपंग विद्यालयातील आरोपी शिक्षकास अखेर समन्स जारी
मुखेड/नांदेड- नरसाबाई निवासी अपंग विद्यालयातील आरोपी शिक्षकास अखेर समन्स जारी करण्यात आले.
मुखेड तालुक्यातील नांदेड ते बिदर जाणारा राष्ट्रीय महामार्ग 161 (अ ) वरती असलेले वडगाव हे गाव या गावामध्ये मागील दोन ते तीन दशका पासून नरसाबाई निवासी अपंग विद्यालयात संघप्पा घाळप्पा मिसे हे अपंग विदयार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य करित असतात.
संघप्पा घाळप्पा मिसे यांचे मूळ गाव येडडूर ता. देगलूर जिल्हा. नांदेड येथील असून त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाकरिता म्हणून त्यांच्याच ओळखीच्या मित्राकडून मित्रत्वाच्या नात्याने 3 लक्ष रुपये (हात उसने ) घेतले. व ती रक्कम दोन महिन्यात परत करण्याचे वचन दिले. तेंव्हा फिर्यादीने त्यांच्या जवळील व त्यांच्या मित्रा जवळून
(हातउसने )पैसे घेवुन आरोपी शिक्षक संघप्पा घाळप्पा मिसे यास एका पंचासमक्ष 3 लक्ष रुपये
(हात उसने )दिले. ही रक्कम आरोपी शिक्षकांने दोन महिन्यात परत करीन असे पंचा समक्ष वचन फिर्यादीस दिले. दोन महिने उलटून गेल्यानंतर आरोपीला फिर्यादीने हातउसने दिलेली रक्कम परत मागितले. तेव्हा आरोपी शिक्षक
संघप्पा घाळप्पा मिसे यांनी फिर्यादीस 086350 या क्रमांकाचा चेक (धनादेश ) 3 लक्ष रुपयाचा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बाराहाळी , या बँकेचा लिहून स्वाक्षरी करून दिला. व तो धनादेश फिर्यादीस
- 52165154344 या क्रमांकाच्या बचत खात्यावरून वटवून घेण्यास आरोपीने फिर्यादीस विनंती केली. तेव्हा फिर्यादीने चेक हा आरोपीच्या खात्यावर जमा केला.
मात्र तो धनादेश आरोपी च्या खात्यावर न वटता तो धनादेश Bounce (अनादरीत ) झाला. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा बाराहाळी या बँकेने फिर्यादीस Fund Insufficient ( खात्यावर पुरेशी रक्कम नाही ) असा शेरा लिहून बँकेने रिटर्न मेमो फिर्यादीस परत केला. त्यामुळे फिर्यादीने आरोपीस भ्रमनध्वनी द्वारे कॉल केला. मात्र आरोपी संघपा मिसे या शिक्षकाने कॉल उचलण्यास टाळाटाळ केल्याने व आपली फसवणूक झाली आहे.
हे फिर्यादीस समजल्याने फिर्यादीने मुखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे नरसाबाई निवासी अपंग विद्यालय, वडगाव येथील आरोपी शिक्षकाने फिर्यादीची बनावट धनादेश देवून जाणीवपूर्वक फसवणूक केली आहे. म्हणून विध्यमान न्यायालयाने आरोपी वरती नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 138 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकांस दि. 5 जुलै 2022 रोजी मुखेड येथील न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आता पर्यंत या आरोपी शिक्षकाने अनेक नागरिकांना जवळच्या मित्रांना टोप्या घालून लाखो रुपयास गंडविले आहे. अशी चर्चा देखील जनतेत आहे. या न्यायालयाच्या आदेशामुळे बनावट धनादेश देवून फसवणूक करणाऱ्यांचे आता धाबे चांगलेच दानाणले आहेत.
प्रतिनिधी:- प्रशांत पवित्रे, मुखेड-नांदेड
0 टिप्पण्या