Advertisement

जननायक बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी ग्राम पंचायत नवेगांव पांडव येथे साजरी

जननायक बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी ग्राम पंचायत नवेगांव पांडव येथे साजरी

नागभिड –  इंग्रजांच्या हुकूमशाही धोरणाला न जुमानता ज्यांनी इंग्रजांचा व तत्कालीन समाजव्यवस्थेचा निषेध करत उलगुलान केले त्या महान आदिवासी जन नायक बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी नुकतीच ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे त्यांना अभिवादन करून करण्यात आली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत नवेगाव पांडव कडून दिव्यांग व्यक्ती साठी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव पांडव ला व्हील चेअर कार्यक्रमाला उपस्थित सरपंच अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या हस्ते देण्यात आली.  यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या वतीने ग्रामपंचायत नवेगाव पांडव चे व या व्हील चेअर साठी पुढाकार घेतल्या बद्दल सरपंच ॲड शर्मिला रतनकुमार रामटेके यांचे आभार मानण्यात आले.

या निमत्ताने आयोजित कार्यक्रमात,श्री.नरेन्द क्षीरसागर ग्राम विकास अधिकारी, सदस्य ग्रामपंचायत,श्री. रितेश राजेश्वर पांडव,सौ. निरंजना सोनटक्के ,सौ. कल्पना सुरेश नवघडे,  श्री.विजय श्रीराम नवघडे, श्री.अतुल दादाजी पांडव.श्री.धनराज अलोणे, श्री.सोमेश्वर पांडव हे उपस्थित होते. करण्यात आली व प्राथमीक आरोग्य केंद्राचे कर्मचारीश्री.डब्लु.एम.बारापात्रे.श्री.एस.एम.धारने,श्री .पी.डी.डुबलवार.श्री.आर.बि. सोदरकर,श्री.सचीन गजपुरे, उपस्थित होते.

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या