वंचित बहुजन आघाडी तर्फे धम्मभुमी ब्रम्हपुरी येथे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
ब्रम्हपुरी- ब्रम्हपुरी शहरातील धम्मभुमी येथे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विधवा प्रथा बंद करा म्हणुन जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ प्रेमलाल मेश्राम , व प्रमुख मार्गदर्शक एॅड. गोडांणे, मा. पंचभाई सर, एॅड. अर्चना कांबळे मॅडम, लीनाताई रामटेके, जिल्हा उपाध्यक्षा वंचित बहुजन महीला आघाडी चंद्रपुर तसेच सामाजिक कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लीनाताई नी यावेळी विधवा महीला संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्या संदर्भात म्हणाल्या की, आपल्या समाजात पतीच्या निधनावेळी, अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकु पुसणे, गळ्यातील मंगळसुत्रे तोडणे, हातातील बांगड्या तोडणे, पायातील जोडवे काढणे तसेच महीलांना विधवा म्हणून कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होता येत नाही कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जिवन जगण्याचा समान अधिकार आहे या हीन वागणुकीमुळे या प्रथेमुळे या अधीकारावर गदा येत आहे म्हणजेच कायद्याचा भंग होत आहे गावामध्ये, शहरांमध्ये तसेच देशामध्ये महीलांना सन्मानाने जगता आले पाहिजे त्या करीता विधवा प्रथा बंद करा ही जनजागृती केली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गीत लता मेश्राम यांनी केले सुत्रसंचालन प्रतीमा डांगे यांनी केले व आभार प्रदर्शन लता मेश्राम यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन लीना ताई रामटेके यांनी केले.


0 टिप्पण्या