ओकिनावा शोरीन-रियु नॅशनल कराटे स्पर्धा संपन्न
राज्याची उपराजधानी नागपूर येथे, नुकताच 12 जून, 2022 रविवारला ओकिनावा शोरीन-रियु नॅशनल कराटे स्पर्धा घेण्यात आली. ह्यामध्ये 700 विध्यार्थानी सहभाग नोंदविला होता. त्यातच आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक_ शिहान- गणेश लांजेवार यांच्या अंतर्गत 40 विध्यार्थानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात, काता आणि कुमिते ह्या दोन्ही प्रकारामध्ये ब्रह्मपुरी, वडसा, आरमोरीच्या विध्यार्थ्यांनी 15 सुवर्ण पदक, 10 रजत पदक, तर 12 कांस्य पदक पटकाविले.
तर, ब्रह्मपुरी मधील सुरपमा बोरकर, अटिक ठवरे, रौनक गेडाम, संचित गजभिये, लोकेश जीवतोडे यांनी प्रत्येकी एक सुवर्ण पदक आणि तनुजा इजकापे, माही अवसरे, पारस समर्थ यांनी रजत पदक मिळविले तर लक्ष्मी आळे, विभाश्री भेंडारे, किरण भुते यांनी कांस्य पदक पटकाविले. सर्वात जास्त पदक पटकवणारी टीम ब्रह्मपुरी कराटे असोसिएशन ठरली असून द्वितीय क्रमांकाचे चषक सुद्धा प्राप्त केले.
सर्वांनी आपल्या यशाचे श्रेय शिहान-शेख दत्तू, शिहान-गणेश लांजेवार, सेन्सेई -सचिन भानारकर, सेन्सेई-कृष्णा समरीत यांना दिले. तसेच चंद्रपूर जिल्हा आष्टेडू मर्दाणी आखाडा चे अध्यक्ष श्री.गणेश तार्वेकर, आणि सामाजिक कार्यकर्ते उदय पगाडे यांनी ह्या सर्वांचे अभिनंदन केले.
राहुल भोयर, ब्रम्हपुरी-चंद्रपूर



0 टिप्पण्या