शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मोठे योगदान – आ. सुधीर मुनगंटीवार
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे अभिवादन
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम गिरनार चौक येथील जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आला त्याप्रसंगी महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थांनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून दिले व विविध शिष्यवृत्तीची निर्मिती करून उच्च शिक्षणासाठी मोठे योगदान त्यांनी दिले सदर अभिवादन कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भाजपा नेते रामजी लाखीया,महामंत्री रवींद्र गुरनुले,माजी नगरसेवक राजीव गोलीवार,मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे,रवी लोणकर,दिनकर सोमलकर,ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी,महानगर सचिव
रामकुमार आकेपेल्लीवार,राकेश बोमनवार,महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा बोरगमवार,उपाध्यक्षा मंजुश्री कासनगोट्टूवार,प्रवीण उरकुडे,विक्की मेश्राम,महेश कोलावार,पवन ढवळे,अंबर काणेकर,वर्षा सुरुंगळीकर,प्रणिता कोसे,बिरेंद्र माझी,चंद्रिका माझी,सोनी सिंग,वैशाली पांडे,भारती उपाध्ये,प्रवीण गिलबिले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती



0 टिप्पण्या