प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान चा भोन्गड कारोबार, डॉ. च्या ऐवज नर्स सांभाळत असते OPD: कन्हान नगराध्यक्षा
कन्हान:- कन्हान शहर मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात कन्हान च्या नगराध्यक्षा यांनी अचानक भेट दिली असता त्यांना आढळले कि प्राथमिक आरोग्य केंद्रात जनतेच्या जीवाशी खेळल जात आहे.इथे वेळेवर डॉ. येत नाहीं व डॉक्टरांच्या न आल्यानी इथल्या नर्स डॉक्टरांच्या जागी रुग्णांना तपासून औषद दिली जाते. असला रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ इथे सुरु असल्याचा नगराध्यक्षा यांच्या समोर, प्रत्यक्षात ही घटना आढळली. व असल्या घटना भविष्य होणार नाही अशी ताकीद त्यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान मध्ये OPD ची सकाळची वेळ सकाळी ०९:00 ते १२ पर्यंत असते. त्या वेळेत डॉक्टर कधीच उपलब्ध नसतात. सध्या विध्य्मान डॉ. आर्या वैद्य ह्या आहेत, व त्या आपल्या कामाप्रती निष्ठावान नसल्याचे कन्हान नगरअध्यक्षा ह्या आपल्या शब्दातून प्रतिपादन केले.
त्याच बरोबर सायंकाळचे OPD ची वेळ ०४:00 ते ०५:00 पर्यंत असते व जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान मध्ये जवळपास नर्स १५ व MPW जवळपास 8 इत्यादी कर्मचारी ची स्टाफ आहे. तरी सुद्धा रुग्णांना वेळेवर वेळेवर उपचार मिळत नाही व डॉक्टरांची सेवा प्रदान होत नसल्याची माहिती पुढाकार समाचार ला कन्हान नगराध्यक्षा ह्यांनी दिली.
त्यांनी आमच्या प्रतिनिधी बोलतांना हेही सांगितले कि मी जेव्हा अचानक प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ला भेट दिली तेव्हा तिथे डॉक्टर उपलब्ध नवते. व त्यांच्या ठिकाणी नर्स माया कम्बाले ह्या OPD सांभाळत होत्या. व त्या दरम्यान मला 3 नंबर चे रुग्ण आढळले जे खंडाला गावाचे होते, त्यांना वेळेवर सेवा मिळाली नाही, त्यांची प्रकृती इतकी होती कि त्यांना नागपूरला हलवणे गरजेचे होते. पण त्या वेळेस वेळेवर डॉक्टर नसल्यानी त्यांनी नागपूर ला न हलविता तिथेच सलाईन लाऊन ठेवण्यात आले.व नंतर त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली. इत्यादी माहिती आमच्या प्रतिनिधी समक्ष कन्हान नगराध्यक्ष ह्यांनी सांगितले.
दिनांक 20/05/2022 रोजी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली असता ODP मधे डॉ. आर्या वैद्य यांनी त्यांचा रेलिवर ला चार्ज न देता त्या घरी निघून गेल्या व माया कंबाले नर्स यांना OPD चार्ज देऊन गेल्या.
कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात होत असलेला भोगड कारभार सुरू आहे, नागरिकांचा आरोग्य सोबत खेळ होत आहे. सकाळ चा OPD ला 100 पेक्षा अधिक पेशंट असून तेथील स्टाफ वेळे वर उपस्थित राहत नाही. हजरी वही वर एक दिवसाचा आधी पासून हाजरी लावतात. असा स्पष्ट मत कन्हान नगराध्यक्ष ह्यांनी केले.


0 टिप्पण्या