घाटरोहना येथुन गोंडेगाव कोळसा खदान चे ४ लाईटाचे लोंखडी खांब चोरी
फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १४ किलो मीटर अंतरावर घाटरोहना कच्चा रोडवर ठेवलेले लोंखडी खांब कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी वेकोलि सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध सुरू केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक.१३ मई च्या पुर्वी २ ते ५ वाजता दरम्यान वेकोलि गोंडेगाव खुली खदान प्रतिबंध क्षेत्रातील घाटरोहना कच्चा रोड येथील लाईटींग करिता आठ लोंखडाचे खांब ठेवले असता त्यातील चार लोंखडी खांब अंदाजे किंमत ५८,१८४ रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी वेकोलि सुरक्ष अधिकारी नागनाथ चरणदास खोब्रागडे वय ४५ वर्ष राहणार गोंडेगाव खदान यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्रतिनिधि – ॠषभ बावनकर, कन्हान-nagpur


0 टिप्पण्या