Advertisement

अहेर नवरगाव येथे अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांकडून धाड

अहेर नवरगाव येथे अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांकडून धाड

ब्रम्हपुरी – पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी अंतर्गत मौजा अहेर नवरगाव येथे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणा – या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला.

त्यांचेकडून नगदी रोकड मोबाईल ई . वस्तू जप्त करण्यात येउन त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .

दि.१४ मे  रोजी सायंकाळी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की , मौजा अहेर नवरगाव येथील बाजार चौकमधील संजय मेश्राम याचे दूकानाच्या मागे काही लोक ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत . त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन धाड टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच ७ जणांना पकडण्यात आले . त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या ९०५५० रू नगदी कॅश , ३ मोबाईल एकूण किंमत २०,८०० रू. , ५० रू . ताशपत्ते असा एकूण १११४०० रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . जुगार खेळणाऱ्यांना पोस्टेला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . सदरची कार्यवाही श्री . मल्लिकार्जून इंगळे , उपविभागीय पोलीय अधिकारी , मुल अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपूरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी मोरेश्वर लाकडे , पोहवा  अरून पीसे , अशोक मांदाडे , नापो  योगेश शिवनकर , उमेश बोरकर , पोशी  नरेश कोडापे , प्रमोद सावसाकडे प्रकाश चिकेराम यांनी केली .

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या