Advertisement

चंदाताई ठाकरे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित

चंदाताई ठाकरे आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित

ब्रम्हपुरी -चंद्रपूर पोलीस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला . यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार करून पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान साजाच्या महिला तलाठी चंदाताई ठाकरे यांना मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते धनादेश व प्रमाणपत्र देऊनआदर्श तलाठी पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार ,प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मितली सेठी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे  उपविभागीय अधिकारी रोहन घुगे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी संदीप भस्के ,तहसीलदार उषाताई चौधरी व मंडळ अधिकारी नरेश बोधे यांचे मार्गदर्शनाखाली महिला तलाठी चंदा ठाकरे यांनी सन 2021-22 या वर्षात मुदतपूर्व शासकीय वसुलीचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण करून तब्बल 65 अतिक्रमण प्रकरणे शोधून नियमानुकुल करण्यास प्रस्ताव पाठवले व ती अतिक्रमणे नियमाकुल करण्यात आली. या शिवाय गरजू लाभार्थींना पट्टे मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. एव्हढेच नाही तर शेतकरी व विद्यार्थी यांचे सोबत त्यांची नेहमीच सौजन्यपूर्वक वागणूक राहिली आहे. एक आदर्श महिला तलाठी म्हणून ब्रम्हपुरी तालुक्यात चंदा ठाकरे यांची ओळख आहे. विशेष म्हणजे आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त झालेल्या चंदाताई ठाकरे या प्रथम महिला तलाठी आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन  केले जात आहे.

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या