नवलाखउंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संदिप शेटे तर व्हाईसचेअरमनपदी विठ्ठल बधाले यांची बिनविरोध निवड
वडगाव मावळ (पुणे)नवलाख उंबरे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संदिप नामदेव शेटे यांची चेअरमन पदी व विठ्ठल चिंधु बधाले यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली व निवडणूक अधिकारी म्हणून राकेश निखारे (साहेब) व सचिव संजय ढोरे यांनी काम पाहिले व ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उद्योजक सुधाकर शेळके व पी.डी.सी.सी. बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी प्रयत्न केले.
यामध्ये माजी चेअरमन तानाजी पडवळ, माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी उपसरपंच रवी कडलक, दिनकर शेटे , नवनाथ पडवळ , सरपंच रामनाथ बधाले उपस्थित होते.
संचालक भगवान बधाले, चंद्रकांत बधाले, तानाजी पडवळ, तानाजी जाधव, एकनाथ गायकवाड, संभाजी कडलक सागर शेवकरी, इंदुबाई बधाले, सुगंधाबाई सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी चेअरमन संदीप शेटे यांनी सांगितले शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जशेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करुन व्यवसायासाठी प्रवृत्त करणार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करुन व्यवसायासाठी प्रवृत्त करणार यामध्ये मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके व पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोसायटी बिनविरोध झाली. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका उद्योजक सुधाकर शेळके व अँड नामदेव दाभाडे यांनी पार पाडली.
प्रतिनिधी सुखदेव जाधव ,वळगावमावळ-पुणे


0 टिप्पण्या