राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी: कन्हान येथे भाजप चे राज्य सरकार विरोधात निर्दशने
कन्हान – राज्यात महाविकास आघाडी सरकार च्या नाकारते पणामुळे ओबीसी आरक्षण हिरावले गेले आहे . हा मुद्दा राज्यात मागील अनेक दिवसान पासुन पेटला असुन महाविकास आघाडी सरकार या कडे लक्ष केंन्द्रीत न करत असल्याने कन्हान तारसा चौक येथे भाजपा कन्हान शहर ओबीसी आघाडी च्या पदाधिकार्यांनी राज्य सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन करुन राज्यात ओबीसी आरक्षण तात्काळ लागु करण्याची मागणी केली आहे .
मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली आणि त्यांना आरक्षण मिळाले असुन राज्यात सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले आहे . मध्य प्रदेश सरकार ने सुरुवातीला एकत्रित डेटा दिला . त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय डाटा देण्यास सांगितले होते . मध्य प्रदेश सरकारने तातडीने कार्यवाही करीत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय डाटा दिल्याने तिथे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली असुन राज्यात ट्रिपल टेस्ट करण्याऐवजी परत केंद्राकडे बोट दाखवण्यात आले . त्यामुळेच आज आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे . महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट करण्याचा पहिला आदेश दि .१३ डिसेंबर २०१ ९ रोजी दिला होता . त्यानंतर राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असती , तर आज ही वेळ आली नसती . आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होतील अशी स्थिती या सरकारमुळे आली असुन दोन वर्षांपूर्वी ट्रिपल टेस्ट केली असती तर ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले नसते . राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावले गेल्याने राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याचा मागणी करिता कन्हान तारसा चौक येथे भाजपा कन्हान शहर ओबीसी आघाड़ी च्या पदाधिकार्यांनी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी आघाडी अध्यक्ष ओमप्रकाश टेकाडे , महामंत्री रामभाऊ दिवटे व शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात राज्य सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी व्यंकटेश कारेमोरे , सुनील लाडेकर , रिंकेश चवरे , कामेश्वर शर्मा , विनोद किरपान , राजेंद्र शेंदरे , अजय लोंढे , मनोज कुरडकर , शैलेश शेळके , संजय रंगारी , विक्की सोलंकी , अदरीराम कनोजिया , भरत सावळे , रविंद्र महाकाळकर , मयुर माटे , अमोल साकोरे , ऋषभ बावनकर , सौरभ पोटभरे , आकाश वांडणकर , तुलेषा नानवटकर , सुषमा मस्के , पौर्णिमा दुबे , सुषमा चोपकर , वर्षा लोंढे , सुनंदा दिवटे , लक्ष्मी लाडेकर , प्रतीक्षा चवरे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
पुढाकार २४तास समाचार साठी ऋषभ बावनकर , कन्हान नागपुर



0 टिप्पण्या