Advertisement

एसबीआय बँकेच्या मॅनेजरची असभ्य वागणूक:उदापुर शाखेच्या व्यवस्थापकाची बदलीची मागणी

एसबीआय बँकेच्या मॅनेजरची असभ्य वागणूक:उदापुर शाखेच्या व्यवस्थापकाची बदलीची मागणी

ब्रह्मपुरी — ब्रह्मपुरी तालुक्यातील उदापूर येथे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा असून या शाखेचे व्यवस्थापक  चिंतामण वासनिक कार्यरत आहेत.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खातेदार आहेत. बँकेचे खातेदार व्यवहार करण्याकरिता गेले असता व्यवस्थापक वासनिक  असभ्य बोलतात. खातेदाराचे व्यवहार करत नाहीत त्यांच्याशी बोलताना अपमानजनक बोलतात त्यामुळे खातेदारांना त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक चिंतामण वासनिक यांची तात्काळ बदली करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.          भारतीय स्टेट बँक शाखा उदापूर येथे आजूबाजूच्या गावातले बरेच खातेदार आहेत. त्यांच्याशी सुद्धा योग्य प्रकारे वागत नाही. यापूर्वीसुद्धा ग्रामस्थांनी भारतीय स्टेट बँकेच्या शाखा उदापुरला घेराव घेतला होता. परंतु व्यवस्थापकाच्या वागणूकी मध्ये बदल झालेला नाही. सदर व्यवस्थापक चिंतामण वासनिक यांची तात्काळ बदली न केल्यास बँके समोर उपोषण व आंदोलन करण्यात येईल अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या