Advertisement

अण्णा मोड ते गोंडेगाव रोडवर पोल्ट्री फार्म समोर भीषण अपघात , एकाचा मृत्यु

अण्णा मोड ते गोंडेगाव रोडवर पोल्ट्री फार्म समोर भीषण अपघात , एकाचा मृत्यु

फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला कोळसा ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १२ किलो मीटर अंतरावर असलेल्या अण्णा मोड ते गोंडेगाव रोडवर पोल्ट्री फार्म समोर एका कोळसाच्या ट्रक चालका ने दोन पायदळी इसमांना मागुन जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात रंजित डेहरिया चा घटनास्थळी मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोस्टे ला कोळसा ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक १८ भी ला रात्री ७०० ते ७१५ वाजता च्या दरम्यान फिर्यादी रोहित केशरी डेहरिया वय २९ वर्ष राहणार सिमरीया,सिवनी मध्यप्रदेश हल्ली मु नांदगाव पोलटी फार्म व फिर्यादीचा मित्र नामे रंजित रामनारायण डेहरिया वय २२ वर्ष राहणार सिमरीया , सिवनी मध्यप्रदेश हल्ली मु नांदगाव पोलटी फार्म हे अन्ना मोड येथुन नांदगाव येथे पायदळ जात असतांना पाठीमागुन येणारे कोळसा ट्रकचे चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवुन फिर्यादी रोहित डेहरिया व मित्र रंजित डेहरिया यांना मागुन  जोरदार धडक मारुन घटनास्थळा वरुन पळुन गेला .

सदर अपघाता मध्ये रंजित डेहरिया हा जागीच मरण पावला तसेच फिर्यादी रोहित डेहरिया याला जख्मी होण्यास कारणीभुत झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी रोहित डेहरिया यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कोळसा ट्रक चालका विरुद्ध अपराध क्रमांक २९९२०२२ कलम २७९ , 3३७ , ३०४ भांदवि (ए) आई पी सी सहकलम १८४ , १३४ , (ए) (बी) मो वा का अ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन फरार कोळसा ट्रक चालका चा शोध घेत आहे

प्रतिनिधि – ॠषभ बावनकर कन्हान-nagpur

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या