Advertisement

नगर परिषद कन्हान–पिपरी आरोग्य विभागातर्फे कन्हान शहर मध्ये मान्सून पूर्व सफाई अभियान: स्वच्छता निरीक्षक-विनोद मेहरोलिया

गेल्या महिनाभरापासून नगर परिषद कन्हान –पिपरी आरोग्य विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी जसे गवलीपुरा,राय नगर,सुरेश नगर , धरम नगर,पिपरी,अशोक नगर ,स्वामी विवेकानंद नगर ,आनंद नगर ,येथील नाल्याची सफाई करण्यात आली आहे.

तसेच राम नगर ,मालधक्का, प्रगती नगर येथील नाल्याची  सफाई सुरु आहे. कन्हान नगर परिषद नगराध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर व स्वच्छता निरीक्षक श्री. विनोद मेहरोलिया यांनी मान्सून पूर्व नाले सफाई, दरम्यान, नागरिकांना सहकार्य करण्याचे आव्हाहन केले आहे. व नाले सफाई विषयी तक्रार असल्यास आरोग्य विभाग येथे संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या