Advertisement

कन्हान शहर विकास मंच नवीन कार्यकारणीचा विस्तार उपाध्यक्ष , सचिव , सहसचिव , कोषाध्यक्ष पद घोषित

कन्हान शहर विकास मंच नवीन कार्यकारणीचा विस्तार उपाध्यक्ष,सचिव,सहसचिव,कोषाध्यक्ष पद घोषित

नवनियुक्त पदाधिकार्यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा सत्कार

कन्हान :- कन्हान शहर विकास मंच ची नवीन कार्यकारणी घोषित करुन नवनियुक्त पदाधिकार्यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांना नोटबुक , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .

कन्हान शहर विकास मंच गेल्या तीन ते चार वर्षापासुन सातत्याने शहरातील विविध विषय प्रशासना समोर ठेवण्याचे कार्य करीत असुन सामाजिक कार्यक्रम सुद्धा करीत आहे. या अनुषंगाने मंच मध्ये काही पद फेरबदल करून पुढे मंच मजबुत व क्रियाशिल करण्याकरिता मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली होती .

या बैठकीत विविध पदांवर चर्चा करण्यात आली असुन सर्वांच्या सहमतीने मंच उपाध्यक्ष पदावर महेंद्र साबरे , सचिव पदावर सुरज वरखडे , सहसचिव पदावर प्रकाश कुर्वे , व कोषाध्यक्ष पदावर महेश शेंडे यांची नियुक्ती करण्यात आली असुन भरत सावळे , प्रभाकर रुंघे , यांची मंच मार्गदर्शक म्हणुन निवड करण्यात आली व शहर विकास मंच चे सातत्याने सुरु असलेले कार्य पाहता युवकांनी मंच मध्ये प्रवेश केल्याने रविवार दिनांक १५ मई ला शहर विकास मंच च्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा व नव्याने प्रवेश घेणाऱ्या सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली .

त्यानंतर मंच उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , व कोषाध्यक्ष महेश शेंडे ह्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा व मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांचा तसेच हरीओम प्रकाश नारायण , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , वैभव थोरात , प्रवीण हुड , हिमांशु डाफ , तेजस उमाळे , सह आदि प्रवेश घेणाऱ्या सर्व सदस्यांचा मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या हस्ते नोटबुक , पेन , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी केले तर आभार ऋषभ बावनकर यांनी मानले

प्रतिनिधी: ऋषभ बावनकर, कन्हान-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या