Advertisement

भुरटे सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांची धाड... खऱ्या डॉनला अर्थपूर्ण व्यवहारातून मोकळीक

भुरटे सट्टापट्टी जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांची धाड… खऱ्या डॉनला अर्थपूर्ण व्यवहारातून मोकळीक

ब्रम्हपुरी – पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत मौजा पटेलनगर ब्रम्हपुरी येथे सार्वजणीक ठिकाणी लोकांकडून कुबेर, राजधाणी, कल्याण येथून खूलणान्या बोगस आकड्यांवर पैशाची बाजी लावून वरली मटक्याचा सट्टापट्टीचा हारजीतचा जुगार खेळणाऱ्या भुरट्या जुगाऱ्यांवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकत त्यांचेकडून नगदी कॅश जप्त करण्यात येवून त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

दि. १२०५२२ रोजी सायंकाळी ब्रम्हपुरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, पटेलगनर ब्रम्हपुरी येथे सार्वजणीक ठिकाणी लोकांकडून कुबेर राजधाणी, कल्याण येथून खूलणान्या बोगस आकडयांवर पैशाची बाजी लावून वरली मटक्याचा हारजीतचा जुगार खेळ खेळीत आहेत सदर ठिकाणी खाजगी वाहनाने वेगवेगळ्या दोन ठिकाणी छापा टाकला असता नमुद आरोपी १) विकास विनायक उईके, वय ४२ वर्ष, रा.पटेलनगर ब्रम्हपुरी यांचेकडून नगदी २१७२ रू व ईतर साहीत्य कि.अं. ०५रू २) सोमेश्वर नारायण कुमरे, वय ४७ वर्ष, रा. पटेलनगर ब्रम्हपुरी याचेकडून १०८० रू व ईतर साहीत्य कि अॅ. ०५ रू सदर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले व दोन्ही ईसमांवर महाराष्ट जुगार प्रतीबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

मात्र खरे डॉन जे हा कल्याण कुबेर व ईतर जुगार सट्टापट्टीचा अवैध व्यवसाय चालवतात त्यांना अभय का दिल्या जातो आहे. या मागे किती अर्थपूर्ण व्यवहार होतो आहे असे जनमानसात मोकळीक पणें बोलले जात आहे. तर या मुख्य डॉन सट्टापट्टीचा चालवणाऱ्याना आज  भुरट्यान्ना पकदून कार्यवाही करण्यात आली त्या प्रमाणे कार्यवाही करुण यांनाही जेलबंध करण्यात येईल की मोकळीक दिली जाईल हे मात्र पूढे समजून नक्कीच पाहायला मिळेल.

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या