मुरूम तस्करीचा केंद्रबिंदू ठरलेल्या बोन्डेगांव वार्डातील तलाठ्याची पत्रकाराशी असभ्य वागणूक…!
पत्रकारांच्या शिष्टमंडळाकडून तलाठी दिशा मेश्राम यांचा निषेध करत निलंबनाची मागणी -जिल्ह्यात पत्रकारांना उर्मट वागणूक देतं शिष्टाचार शून्य’ कर्मचारी घालवतात प्रतिष्ठा
ब्रम्हपुरी- बोन्डेगांव साजाक्षेत्रात करोडोच्या महसूल चोरीला मुख्यत्वे तलाठी तथा महसूल विभागाचे आशीर्वाद असल्याचे आजघडीला स्पष्ट होतं असून बोन्डेगांव साजा क्षेत्रात मागील महिन्यापासून सुरु असलेल्या हजारो ब्रास मुरूम वाहतूक संदर्भात बोन्डेगांव साजा तलाठी दिशा मेश्राम यांना प्रतिनिधी ने विचारणा केली असता त्या पत्रकारास उर्मट वागणूक देतं पदाची प्रतिष्ठा विसरत जबाबदारी न घेता शिष्टाचार विसरत असल्याने बोन्डेगांव साजात करोडोचा महसूल चोरी होतं असल्याच्या चर्चेला ऊत आले आहे.
तसेच अशा असभ्य, उर्मट तलाठी यांचा निषेध करत निलंबनाची आक्रमक मागणी पत्रकाराच्या शिष्टमंडळाने केली आहे.
बोन्डेगांव वार्ड येथे ९ एकर जागेमध्ये शेजारील बोडिमधून जेसीबी च्या साह्याने ७ ते ८ ट्रक्टर च्या मदतीने खाजगी जागेमध्ये जवळपास ७ फूट खोल पर्यंत मुरूम टाकून भरण भरण्यात येत आहे. याबाबत बोन्डेगांव येथील स्थानिक लोकांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी बोंढेगाव याचे कडे तक्रार केली असता सदर काम हे शासकीय कंत्राट पद्धतीनं सूरू असल्याने संबंधीत विभागाकडून रॉयल्टी घेतल्या जातो त्यामूळे आमच्या कडे महिती नसल्यानें महिती उपलब्ध झाल्यावर सांगू असे उत्तर मिळाले.
सदर अवैध माती मुरुम उपसा गेली २५ – ३० दिवसापासून सूरू असल्याने सदर काम वैध की अवैध याबाबत चौकशी करण्याचे काम महसूल विभागाचे असून याबाबत वेळीच खात्री करून घेणे आवश्यक असते तर एखाद्या विभागाकडून कंत्राटी पद्धतीने काम जरी असला तरी संबंधीत विभागाकडून महसुल विभागास तसा रीतसर पत्र व्यवहार झाला असता. व याबाबत माहिती उपलब्ध ठेवणे महसूल विभागाचाच काम असून
तसे महसूल विभागाने उत्तर देणे अपेक्षित नाही. मात्र यामागे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाला असावा अशी शंका आता नाकारता येत नाही.
सदर उत्खनाच्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी एक बडेमिया एक छोटेमिया जे कोणतीही एक नंबरचे काम न करता कोट्याधीश झालेले आहेत अश्या दोन स्थानीक लोकप्रतिनिधीची एक कंपनी तयार करण्यात येणार असून त्याकरिता हे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.
बड्या लोकांसाठी सर्व नियम धाब्यावर ठेवून हे अधिकारी चुप्पी साधून बसने योग्य नसून अंदाजे शासनाचा ७ हजार ब्रासच्या रॉयल्टीची करोडो रुपयांची रक्कम बुडविल्याने शासनाची खूप मोठी महसुली लूट होत आहे. तर यावर मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत चौकशी सुरु असल्याचे सांगत असल्याने नक्कीच यात मोठा घबाळ असल्याची शंका नागरिकांना उपस्थित होतं आहे.
पत्रकारांशी असभ्य वर्तवणूक करीत तलाठी यांनी सदर महसूल चोरीला चालना देतं असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे व बोन्डेगांव साजातील शासनाचा करोडोचा महसूल बुडवणाऱ्या मुरूम तस्करांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे तक्रार निवेदन..
उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी, यांना देऊन प्रतिलिपी महसूल विभागीय आयुक्त, राज्यपाल भगत सिग कोश्यारी, प्राजक्त तनपुरे संपर्क मंत्री चंद्रपूर जिल्हाधिकारी चंद्रपूर, उद्धव ठाकरे मुखमंत्री, यांना उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्फत देण्यात आले.
राहुल भोयर


0 टिप्पण्या