डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वसुंधरा दिन साजरा
ब्रम्हपुरी :- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात एनसीसी विभाग ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी नागपुर च्या वतीने वसुंधरा दिन दिनानिमित्त ब्रह्मपुरी शहरांमधून असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शना खाली समाज जनजागृती करणारी रॅली काढण्यात आली.
यात पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे .याबाबत कॅडेट्सनी संदेश दिला. सदर रॅली महाविद्यालयातून निघून- बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे चौक ते गांधीनगर मधून ग्रामीण रुग्णालयापर्यंत काढण्यात आली . या प्रसंगी महाविद्यालयामध्ये एनसीसी कॅडेट च्या वतीने वसुंधरा दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेमध्ये ३५ कॅडेट्सनी सहभाग घेतला . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ. देवेश कांबळे, संस्थेच्या सदस्या प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.जे. एम. मेश्राम हे उपस्थित होते.
राहुल भोयर प्रतिनिधी


0 टिप्पण्या