सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ-पिपरी येथे नवरात्रीचे समापन
कन्हान-पिपरी:- सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडल पिपरी च्या वतीने चैत्र नवरात्र निमित्य दुर्गा मंदिर पिपरी येथे घटस्थापना करण्यात आली होती.दररोज पूजापाठ ,महाआरती भजन गायन करीता अस्टमी ह्या दिवशी हवन यज्ञ करून महाप्रसाद वितरण करण्यात आले. घट विरजण कन्हान नदीच्या पवित्र पाण्यात विसर्जित करून चैत्र नवरात्राचे समापन करण्यात आले. ह्यावेळेस केसरीचंद्र खंगारे, राधेश्याम भोयर, प्रशांत मसार,रवी अजबले, अजबराव कडनायके, देवाजी येलमुले, चंद्रभान चौधरी, सुधाकर तीवाडे, संजय खंडले,महेश मेश्राम, दिलीप येलमुले, पुष्पा खंगारे,ज्योती येलमुले, कल्पना खंगारे, दुर्गा कोरवते, वनिता मसार,वर्षा रामगुंडे, ताराताई ठाकरे, आदि मोठ्या संखेने भक्त उपस्थित होते.



0 टिप्पण्या