Advertisement

स्वच्छ भारत अभियान प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

स्वच्छ भारत अभियान  प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर कारवाई

नागपूर, ता. ०४  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.४) रोजी ०३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १८  हजार रुपयांचा  दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत वर्धा रोड, रामदासपेठ येथील साकेत अर्थो या दुकानांवर प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे गांधीबाग झोन अंतर्गत तिन नल चौक इतवारी येथील मामा प्लास्टिक या दुकानांवर प्लास्टिक  पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

तसेच धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील विनर इन्स्टीटयुट यांच्याविरूध्द इलेक्ट्रीक खांबावर बॅनर आणि फलक लावल्याबद्दल कारवाई करून ८  हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

प्रतिनिधी जयंत डोंगरे, कामठी-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या