Advertisement

धम्मभूमी ब्रम्हपुरी येथे भिमा कोरेगांव - विजय स्तंभ साकारणार

धम्मभूमी ब्रम्हपुरी येथे भिमा कोरेगांव – विजय स्तंभ साकारणार

प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 131 वी जयंती धम्मभूमी ब्रम्हपुरी येथे साजरी झाली . सकाळी 8.00 वाजता धम्म ध्वजारोहण व बुद्ध वंदना घेण्यात आली . 8.30 वाजता उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला . सायंकाळी धम्मभूमीच्या प्रांगणात सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी धम्म प्रचार केंद्राचे अध्यक्ष डॉ. प्रेमलाल मेश्राम होते. प्रमुख वक्ते मा.अॅड एकनाथ रामटेके औरंगाबाद हे होते, मा सुखदेव प्रधान सर मंचावर उपस्थित होते . डी . के . मेश्राम यांनी विजयस्तंभासाठी दोन लाख रु . जाहिर केले . सर्व प्रथम शहरातील वार्डावार्डातील असलेल्या कार्यकत्यांच्या हस्ते भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

मंडळाच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . विजय स्तंभ दान करणारे डि के . मेश्राम यांचा  सत्कार करण्यात आला . त्यानंतर विजयस्तंभाचे भूमीपूजन करण्यात आले . या प्रसंगी मा . रोशन यादव ठाणेदार ब्रम्हपुरी , दानकर्ते डि . के मेश्राम व मान्यवर मंडळी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड एकनाथ रामटेके औरंगाबाद यांनी बाबासाहेबांचे संघर्षमय जीवन आई रमाईचे बलीदान व आंबेडकर घराणे आजही समाजासाठी करीत असलेले कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी वाचणाची मार्गदर्शन मेळावे ऐकून घेण्याची समाजाला गरज आहे.  पुढे येणारी पिढी विद्वान होईल अन्यतः नशा पाणी करून डि . जे . वर नाचून बाबासाहेब जनतेला समजनार नाही , तर त्यामुळे समाजाची अधोगती होईल असा इशारा त्यांनी दिला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ . प्रेमलाल मेश्राम म्हणाले की , धम्मभूमी ही धम्म शाळा आहे येथे बालमनावर धम्माचे संस्कार दिले जातात . बांधवांनी आपल्या मुलांना दर रविवारला स . 8.00 वाजता धम्मभूमीवर पाठवावे . धम्म प्रचार केंद्र ब्रम्हपुरी या संस्थेचा मुख्य उद्देश धम्माचा प्रचार प्रसार करणे हा आहे . धम्मभूमीच्या विकासासाठी मा . शिंगाडे सा . प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन महा . ब्रम्हपुरी यांनी 5 हजार रूपये दिलेत . त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले . कार्यक्रमाचे आभार मंडळाच्या सदस्या प्रतिभा डांगे यांनी मानले .

यानंतर धम्मभूमीवर आलेल्यांना भोजन दान करण्यात आले . शेवटी पद्मीनी धनविजय व संच यांनी भिम बुद्ध गीते कार्यक्रम सादर केला . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी , आजीव सभासद , तसेच लिलाधर वंजारी , अश्वजीत हुमणे , सुशील बन्सोड , रामदास गायकवाड , मनिषा उमक , एम . एस . कऱ्हाडे , सुकेशनी बन्सोड व इतर वार्डातील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या