Advertisement

सुरगाना मध्ये आहेर हॉस्पिटल यांच्या मार्फत आणि सुजय नेत्र सेवा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

सुरगाना मध्ये आहेर हॉस्पिटल यांच्या मार्फत आणि सुजय नेत्र सेवा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

सुरगाणा :- सुरगाणा शहरातील आहेर हॉस्पिटल आणि सुजय नेत्र सेवा यांच्या सहकार्यातून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सुरगाणा तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील लोकांसाठी आपल्या डोळ्याचे कार्य आणि त्यांची देखभाल कशी घ्यावी आणि डोळ्यांचे महत्व पटवून देण्यासाठी ह्या छोट्या खाणी एक मोठया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

165 हून श अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला व उपस्थिती नोंदवली.या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले  ते या हॉस्पिटल चे डॉक्टर डॉ नितीन सुरेश आहेर आणि डॉ सागर रमेश आहेर. तसेच डॉ विनोद रामदास महाले सर यांनी देखील मोलाचे सहकार्य लाभले.. खऱ्या अर्थाने या शिबिरासाठी आपल्या मेहनतीने  कार्यक्रमासाठी उत्कृष्ट काम केले ते ह्या हॉस्पिटल चे कर्मचारी विनायक गावित यांनी.कार्यक्रमाच्या सांगता करताना डॉ आहेर सर यांनी ह्याचे कौतुक देखील केले.

सुजय नेत्र सेवा नाशिक येथील नेत्र तज्ञ डॉ नानासाहेब खरे आणि त्यांचे कर्मचारी यांनी देखील ह्या शिबिरात आपले योगदान देऊन शिबीर यशस्वी रित्या पार केले . शिबिराची सांगता मान्यवरांचे  सत्कार करण्यात आले यावेळी आहेर हॉस्पिटल चे डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते

प्रतिनिधी- गणेश गाडेकर, सुरगाणा-नाशिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या