Advertisement

शिक्षण हेच ध्येयपुर्तिचे एकमेव साधन:सुरज मेश्राम

शिक्षण हेच ध्येयपुर्तिचे एकमेव साधन -सुरज मेश्राम

ब्रम्हपुरी – विद्यार्थ्यांनो जीवनामध्ये काही बनायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण घ्यावेच लागेल. आजचा तुमचा संघर्ष तुमचं उज्वल भविष्य निर्माण करणार असे प्रतिपादन ब्रम्हपुरी चे युवा नेतृत्व तथा वक्ते सुरजभाऊ मेश्राम यांनी केले.ते ख्रिस्तानंद स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज इथे आयोजित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.

समोर ते म्हणतात की कोणतेही यश सहज मिळत नाही तर ते मिळवण्यासाठी कठोर मेहनत व आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे, शाळा हे उत्तम विदयार्थी तसेच देशाचे जबाबदार नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. कोणत्याही देशाची प्रगती हे शिक्षणाद्वारे होऊ शकते. देशाचा पाया मजबुत करायचा असेल तर देशातिल जास्तित जास्त विद्यार्थी  उच्चशिक्षित झाले पाहिजे.

उच्चशिक्षित विद्यार्थी नवनविन प्रयोग करुन क्रांती घडवू शकतात. तेव्हा केवळ शिक्षणच नाहि तर उच्च शिक्षण   घेवुन देशाच्या विकासात योगदान द्या. विद्यार्थ्यांनो तुमचे शिक्षण हेच तुमचे ध्येय पूर्ण करेल. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर दिपा जोस, उपमुख्यध्यापिका सिस्टर मेरिन, शिक्षकवृंद, इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

राहुल भोयर प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या