शौचालयात लाईटाची सुविधा उपलब्ध, नियमित साफ सफाई व प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील शौचालय सुरु करण्याची मागणी
कन्हान शहर विकास मंच पदाधिकार्यांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत शिव पंचायत हनुमान मंदिर च्या मागे कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला नगर परिषद प्रशासना नागरिकांन करिता शौचालयाचे निर्माण करण्यात आले असुन ह्या शौचालया मध्ये लाईटाची , पाण्याची सुविधा नसुन नियमित साफ सफाई होत नसल्याने गंदगी चे साम्राज्य निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ शौचालयात लाईटाची , पाण्याची सुविधा उपलब्ध करुन नियमित साफ सफाई करण्याची व प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील शौचालय तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे .
मागील वर्षी नगर परिषद प्रशासन द्वारे शिव पंचायत हनुमान मंदिर च्या मागे कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला शौचालयाचे निर्माण करण्यात आले होते . परंतु ह्या शौचालय मध्ये नप प्रशासनाने लाईटाची , पाण्याची , सुविधा उपलब्ध न केल्याने ह्या शौचालयाची व्यवस्था पुर्णपणे विस्तळीत झाली आहे . ह्या शौचालय मध्ये नागरिक दिवस रात्र सातत्याने जात असतात परंतु पाण्याची सुविधा नसल्याने व नियमित साफ सफाई होत नसल्याने शौचालयाची बदबु संपुर्ण परिसरात पसरत असल्याने नागरिकांच्या स्वास्थ्य ला धोका निर्माण झाला आहे .
तसेच ह्या परिसरात मोठ मोठे साप सारखे घातक सरपटणारे प्राणी सतत निघत असतात मागील काही महिन्या पुर्वी भर दिवसा शौचालय मध्ये मोठा धामन साप निघाला होता व याची तक्रार नगर परिषद प्रशासन ला सुद्धा करण्यात आली होती . परंतु नगर परिषद प्रशासना ने या कडे दुर्लक्ष करुन आता पर्यंत शौचालय मध्ये नप प्रशासनाने लाईटाची सुविधा उपलब्ध न केल्याने रात्रीच्या वेळी सर्पदंशाची शक्यता वाढली आहे .
तसेच नगर परिषद प्रशासना ने दुसरे शौचालयाचे निर्माण कार्य प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले आहे . परंतु हे शौचालय उद्घाटना नंतर जसे चे तसे नप प्रशासनाने बंद करुन ठेवल्याने बाहेर गावा वरुन आलेल्या नागरिकांनी व फुटपाथ दुकानदारांनी शौचालया करिता कुठे जायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ शौचालयात लाईटाची , पाण्याची सुविधा उपलब्ध करुन नियमित साफ सफाई करण्याची व प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील शौचालय तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , हरीओम प्रकाश नारायण , कृणाल राजपुत सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
प्रतिनिधी:- ऋषभ बावनकर, कन्हान-नागपूर


0 टिप्पण्या