Advertisement

रामटेक विधानसभा आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवस निमित्य कन्हान मध्ये भव्य रोग निदान शिवीर संपन्न

रामटेक विधानसभा आमदार श्री आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवस निमित्य कन्हान मध्ये भव्य रोग निदान शिवीर संपन्न

कन्हान(पारशिवनी):- दिनांक 3 एप्रिल २०२२ ला, रामटेक विधानसभा आमदार आशिष जयस्वाल यांच्या वाढदिवस निमित्य भव्य रोग निदान शिवीर आयोजित करण्यात आले होते. शिवीर ची वेळ सकाळी १०:०० वाजता पासून करण्यात आली होती. मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

रोग निदान शिविर चे आयोजन कन्हान माधीर तारसा रोड वरील वानखेडे हॉस्पिटल मध्ये आयोजित करण्यात आले होते. आयोजक शिवसेना पक्ष चे उपजिल्हा प्रमुख श्री वर्धराज पिल्ले यांच्या प्रमुखते मध्ये आयोजित  केले होते. रोग निदान शिवीर चे औषधी व ऑपरेशन चे खर्च ते स्वता करतील असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले.

शिवीर मध्ये सर्व प्रकारचे आरोग्य तज्ञाचे समावेश ह्या वेळेस करण्यात आले होते. मोठ मोठ्या तज्ञान घेऊन गोरगरीब जनतेसाठी मोफत आरोग्य शिविराचे आयोजन श्री वर्धराज पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आले होते. रोग निदान शिविरात गरजू व आजारी रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आल्या. संपूर्ण रुग्णांची BP व शुगर तपासणी करून आरोग्य व आजाराविषयी विशेष तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करून मोफत, औषधी चे वितरण देखील ह्यावेळेस करण्यात आले.

शिवीर चे आयोजन रामटेक विधानसभा स्तरावर करण्यात आले असता दुपारच्या जेवणाची व्यवस्था देखील ह्यावेळेस सर्व शिवीर उपस्तीथांकारिता करण्यात आली होती. भव्य रोग निदान शिवीर मध्ये मुख्यता बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, छाती व सामान्य चिकित्सा, हृदय रोग तज्ञ, सर्जन, इत्यादी प्रकारचे तज्ञ डॉक्टर ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्थित होते.

आशा हॉस्पिटल च्या नर्सिग स्टफ मधील मीनल बगुलकर, प्राची शरणागत, प्राची बोरकर, दर्शन चापले,आदर्श चोरे,श्रद्धा धोपटे, ऋतुजा रेवाडे, भाविका राठोड,पायल मडावी,आरुषी गराडे,गुंजन काढे, दिगंबर राऊत, मोनाली वसनिक, अमिषा रंगारी,प्रांजली लोहारे. यांनी आपल्या अथक श्रमदान करून गोरगरीब जनतेला खूप छान प्रकारे साभाळून घेतले, त्यासाठी शिवसेना पक्ष तर्फे विशेष आभार व्यकत करण्यात आले.

रामटेक क्षेत्राचे आमदार श्री आशिष जैस्वाल यांच्या वाढदिवसाचे अवचीत्य साधून हा भव्य आरोग्य शिवीर आयोजित करण्यात आले होते. ज्यांना ऑपरेशन ची गरज आहे अस्य गरजू गरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन ची सुविधा देखील करण्यात आली आहे. ह्या निशुल्क रोगनिदान शिबिरात ५०० रुग्नानाच्या जवळपास तपासणी करून रुग्णांना आवश्यक औषद देण्यात आली.

शिवीर मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांच्या आगमनाच्या वेळी मोठ्या ढोल-ताश्यानी स्वागत करण्यात आले होते. शिवीर मध्ये केक कापून मोठ्या प्रमाणात भव्य रोग निदान शिवीर ची सुरवात करण्यात आली होती. ह्यावेळेस प्रामुख्यानि उपस्थित रामटेक लोकसभा खासदार श्री कृपालजी तुमाने, यांनी शिवीर मध्ये योगदान दिले व स्थानीक नागरिकांना संबोधन केले.

त्याच बरोबर कन्हान-पिपरी नगर परिषद  कन्हान शहर च्या नगरध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर, उपाध्यक्ष श्री डायनल शेंडे,पारशिवनी नगर पंचायत अध्यक्षा सौ. प्रतिभा कुंभलकर, सरपंच आमडी-हिवरी सौ. शुभांगी भोस्कर, पारशिवनी तालुका प्रमुख शिवसेना श्री राजू भोस्कर, कन्हान नगर-परिषद नगर सेवक श्री अनिल ठाकरे, राजेश यादव, नगर सेविका सौ. मोनिका पौनीकर शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे, शिवसेना महिला शहर प्रमुख मनीषा चिखले, सुमित कोठारी,संजय नेवारे, गौरव पनवेलकर, भारत पगारे, सुनील पिल्ले,शिव कुरील, चिंटू वाकुडकर,रवी यादव, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण, हरीश तिकडे, समशेर पुरवले, अर्जुन पात्रे,गणेश भालेकर, अरुण खडसे, प्रीतम शेंडे, वैशाली श्रीखंडे, वनिता मेश्राम, लता लुंढुरे,शुभांगी घोगले, जोशीला उके,कुंदा मोटघरे,इंदिरा कुर्मी, महेश खवले,निक्कू पिल्ले,शारुख खान, सनी सिंह, मनीष सिंह, राजन सिंह, दीपक सिंह, रजनीश शिंह, रवी गिरी,  तसेच मोठ्या संखेनी शिवसेना कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

ह्यावेळेस पत्रकार चंद्रकांत चौकसे सर, मालवे सर, रोहित मानवटकर, प्रामुख्यानी उपस्थित होते.

श्री वर्धराज पिल्ले यांनी समस्त डॉक्टर, मेट्रन, नर्सेस, वार्ड बॉय आदि मान्यवरांचे विशेष आभार व्यक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या