गँस,पेट्रोल ,डिझेल आणि जिवनावश्यक वस्तुंची, वाढती महागाई कमी करा:वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
ब्रम्हपुरी – केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल अशी प्रत्येक घटकाची भाव वाढ केली आहे.केंद्र सरकार भांडवलदाराचे सरकार आहे व त्या प्रमाणे वागतही आहे.केंद्र आणि राज्य सरकार ने त्यांच्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल आणि डिझेल चे भाव इतके वाढवले आहे. कि सर्वसामान्यांचे जगणे अगदी कठीण झालेले आहे.
गँस चे दर ही इतके वाढवले आहे, भांडवलदारांचा फायदा व्हावा या हेतुने गँसचे दर वाढ केले आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईमुळे रोजचा खर्च कसा करावा, रोज पोटभर दोन वेळेचे पोट भरण्यासाठी सर्वसामान्यांना मोठा प्रश्न पडला आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ही महागाई जर कमी केली नाही तर, पुढे उदभवणार्या परिस्थीतीला हे दोन्ही सरकार जबाबदार असतील .
तसेच समाजात विविध ठिकाणी जातीविषयक तेढ निर्माण करण्यात येत असल्याने देशात अशांतता निर्माण होत आहे. त्यामुळे देशात शांतता राहावी व जातीयतेची तेढ निर्माण करू नये. तसेच घरगुती गँस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव जर कमी केले नाहीत तर पुढील काही दिवसात हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीना ताई रामटेके यांनी यावेळी दीला.
निवेदन देताना यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीना ताई रामटेके, वंदना कांबळे, प्रीती हुमणे जिल्हा सचिव, मृणालीनी सहारे,प्रतीमा डांगे, योगीता रामटेके, अस्मिता लोखंडे, लता मेश्राम, शीतल गायकवाड, प्रमीला पाटील,जास्वंदा घुटके, कीरण मेश्राम व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.
प्रतिनिधी: राहुल भोयर


0 टिप्पण्या