Advertisement

अँड सौ शर्मिला रामटेके यांना विदर्भ भूषण सन्मान

अँड सौ शर्मिला रामटेके यांना विदर्भ भूषण सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे विदर्भ स्तरीय दुसरे अधिवेशन वणामती सभागृह नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड चे विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे, पत्रकार संघाचे प्रदेक्षाध्यक्ष वसंत मुंडे, मा.सरचिटणीस विश्वासराव आरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात ज्यांनी आपल्या जीवनात सामाजिक, राजकीय कार्यात कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी यशस्वी केली त्यांना हा विदर्भ भूषण सन्मान देण्यात आला.
या अधिवेशनात सरपंच अँड सौ शर्मिला रतनकुमार रामटेके ग्रामपंचायत नवेगाव पांडव, यांना विदर्भ भूषण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथील सरपंच अँड.सौ शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंच नवेगाव पांडव यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या ‌वतीने त्याचा विदर्भ भुषण सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी यानिमित्ताने सरपंच ॲडव्होकेट शर्मिला रामटेके यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सन्मान केल्याबद्दल आभार मानले.

राहुल भोयर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या