वडगाव मावळ मध्ये राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या रहात्या घरावर भ्याड हल्लाचा जाहीर निषेध
वडगाव मावळ (पुणे):-राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या रहात्या घरावर भ्याड हल्लाचा मावळ मध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
वडगाव मावळ येथून शनिवार (दि.०९) निषेध मोर्चा काढण्यात आला असून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, पि.डी.सी. सी. बँकेचे माजी अध्यक्ष बबन भेगडे,मावळ तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठल शिंदे,कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, मुख्य प्रवक्ते राज खांडभोर, जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुळे, मावळ तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, किशोर भेगडे, माजी शहराध्यक्ष राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच विशाल वहिले,शहराध्यक्ष प्रविण ढोरे, तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, अड.रूपाली दाभाडे, माजी उपसभापती दीपक हुळावळे, संचालक सुभाष जाधव, माजी आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ, माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले,माजी तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड युवक अध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, , माजी सरपंच विठ्ठल जाधव, तुकाराम जाधव, नवनाथ पडवळ, सोमनाथ धोंगडे अतुल राऊत, मयुर गुरव आदि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी सुखदेव जाधव ,वडगाव मावळ-पुणे
0 टिप्पण्या