कन्हान ग्रामस्थांना मोठा दिलासा! कार्यालय नगर परिषद कन्हान-पिपरी येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत RL गुंठेवारी ला अनुमती
कन्हान :नगर परिषद कन्हान- पिपरी हद्दीतील ले-आउट व प्लॉट चे शासकीय नियमाप्रमाणे R.L. करणेबाबत सभेच्या निर्णयार्थ सर्वांनिमते ठरव पास करून कन्हान मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला नाही.
सभेत सदर विषय चर्चेला येताच कन्हान नप मुख्याधिकारीयांनी टिप्पणी सादर केली कि नगर परिषद कन्हान पिपरी हद्दीतील ले-आउट व प्लॉट चे शासकीय नियमाप्रमाणे R.L. करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमितीकरण, दर्जावाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ व सुधारणा अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणेम श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ प्रशमन शुल्क व विकास शुल्क निश्चितीबाबत शासन निर्णय क्र.गुंठेवा- १०२१प्र.क्र.४८/२०२१नवि-३०, दिनांक १८/१०/२०२१ अन्वये कार्यवाही करण्याबाबत सभेच्या विचारार्थ यावर सभेत सविस्तर चर्चा होऊन ठरविण्यात आले कि,
नगर परिषद कन्हान चा विकास आराखडा शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी असल्याने MRTP ACT मधील कलम ४६ अन्वये प्रस्तावित विकास आराखड्यातील तरतुदींना अनुसरून नियोजन प्राधिकरणाला विकासात्मक परवानगी देणे तसेच अभिन्यास मंजुरी करण्याचे अधिकार आहे. तसेच कन्हान शहरात अनेक अवैध अभिन्यास व बांधकामे असल्याने उपरोक्त शासन निर्णयाप्रमाणे त्याचे नियमितीकरण केल्यास नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होऊन नगरपरिषदेच्या विकासाला चालना मिळेल, तसेच अवैधरीत्या बांधकाम विकासाला आळा बसेल. तेव्हा कन्हान-पिपरी नप मा.मुख्याधिकारी यांनी उपरोक्त शासन नियमातील तरतुदींना अनुसरून अवैध अभिन्यास खुले भूखंड तसेच बांधकामे यांचे नियमितीकरण करावे तसेच प्रस्तावित विकास योजनेतील तरतुदी अन्वये पुढील कार्यवाही करावी असे नगरध्यक्षा सौ करुणा अनिल आष्टनकर यांच्या उपस्थितीत व सभा सर्वानुमते ठरविण्यात आले.
कन्हान-पिपरी नप च्या नगराध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर यांच्या मते खूप दिवसापासून शासकीय कामे व प्रधान मंत्री आवास योजना /रमाई घरकुल योजन चा लाभ लाभार्थीयांना घेता येत नवता, कारण त्याच्या दस्तावेज कमी पडत असल्यानी नवीन योजनेचा लाभ करीता, RL(गुंठेवारी) करून कन्हान मधील नागरिकांना दिलासा दिला आले. संबंधित जागेची गुंठेवारी करीता ठराव सर्वानुमते मंजूर करून कन्हान-पिपरी नागरिकांचा त्रास कमी केला आहे.कन्हान ग्रामस्थांना मोठा दिलासा! कार्यालय नगर परिषद कन्हान-पिपरी येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत RL गुंठेवारी ला अनुमतीकन्हान ग्रामस्थांना मोठा दिलासा! कार्यालय नगर परिषद कन्हान-पिपरी येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत RL गुंठेवारी ला अनुमती


0 टिप्पण्या