Advertisement

तरसा रोड ते गहुहीवरा मार्गे जड-वाहन च्या मा.जिल्हाधिकारी,नागपूर यांचे सुधारित आदेश,तरी सुद्धा कन्हान पोलीसची कुठलीच गतीविधी नाही: श्री वर्धराज पिल्ले

कन्हान मध्ये सुरु असलेल्या तरसा रोड ते गहुहीवरा मार्गे जड-वाहन च्या मा.जिल्हाधिकारी,नागपूर यांचे सुधारित आदेशाचे परिपत्रक जरी, तरी सुद्धा कन्हान पोलीसची कुठलीच गतीविधी नाही: श्री वर्धराज पिल्ले शिवसेना उपजिल्हा प्रमुख, नागपूर-ग्रामीण

कन्हान :- उपरोक्त संदर्भीय पत्राचे अनुषंगाने कन्हान – साळवा स्टेशन मधील लेवल क्रॉसिंग गेट नं. ५५९ किमी ११११२-१४ नागपूर गोंदिया सेक्शन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आरओबीचे कामा करीता बंद करण्यात येळवण्याबाबत संदर्भीय पत्र क्र.२ नुसार खंडाळा चे पुलावरुन कांद्री मार्ग व गहु हिवरा चौक या मार्गाने नागरिकांना कन्हानला ये-जा करता येऊ शकते व गहु हिवरा मार्गाने जबलपूर नागपूर महामार्गाकडे रस्तयाचा वापर करणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वापर करता येईल. त्यामुळे लोकांचे रस्तयाचे सुविधाधिकार बाधित होत नाही.

त्यामुळे आरओबीचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांचे सुरक्षिततेसाठी सदर रेल्वे क्रॉसिंग गेट नं. ५५९ कन्हान साळवा हे बंद करण्यास हरकत नसल्याबाबत संदर्भ क्र. २ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, रामटेक यांनी प्रस्तावित केल्यानुसार रेल्वे क्रॉसिंग गेट नं.५५९ कन्हान साळवा हे बंद करण्यास हरकत नसल्याबाबत महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कॉपोरेशन लि. नागपूर यांना या कार्यालयाचे संदर्भ क्र. ४ अन्वये कळविले होते.

संदर्भ क्र. ५ अन्वये सौ. करुणा अनिल आष्टनकर, नगराध्यक्ष, नगर परिषद, कन्हान व श्री वर्धराज बलराज पिल्ले, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, नागपूर जिल्हा (ग्रामिण) यांचे नगर परिषद, कन्हानपिंपरी हद्दीतील तारा रोड चौक ते गहुहिवरा-चाचेर मार्गावर काही दिवसांपासुन कोळसा, रेती इ.चे १४ चाकी, २० चाकी अशा प्रकारचे जड वाहनांचे वाहतूक मोठया प्रमाणात सुरु झालेले आहे.

सदर दोन्ही मार्ग हे १०-१२ फुटांचेच असल्याने तेथे जड वाहनांची वाहतूक सुरु झाल्याने इतर गाडयांना येणे-जाणे करीता व तेथील स्थानिक नागरिकांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे सदर ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत. त्यामुळे सुधारित प्रस्ताव सादर करणेबाबत विनंती केली आहे. त्याअनुषंगाने तहसिलदार पारशिवनी यांचा मौका चौकशी अहवाल मागविण्यात आला.

तहसिलदार पारशिवनी यांचे मौका चौकशी अहवालानुसार तारसा – खंडाळा रोडवर रेल्वे ब्रिज बांधकाम सुरु असल्यामुळे सदर रोडवरील जड वाहनांची वाहतूक टोल नाका चुकविण्याकरीता कन्हानकडे गहुहिवरा चाचेर या कच्च्या रोडने वाहतूक करतात. सदर रोडचे दोन्ही बाजुस दाट लोकवस्ती असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

करीता गहुहिवारा चाचेर मार्गे कन्हानला येणारी जडवाहनांची वाहतूक बंद करुन जबलपूर महामार्गाने (टोल नाका रस्तयाने) जड वाहनांची जाण्या-येण्याकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच सदर गावातुन फक्त लहान वाहने गहुहिवरा चाचेर मार्गाने जाण्या-येण्याकरीता योग्य राहील असे कळविले आहे. सबब तहसिलदार पारशिवनी यांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे गहुहिवारा चाचेर मार्गे कन्हानला येणारी जडवाहनांची वाहतूक बंद करुन जबलपूर महामार्गाने (टोल नाका रस्त्याने ) जड वाहनांची जाण्या-येण्याकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच सदर गावातुन फक्त लहान वाहने गहुहिवरा चाचेर मार्गाने जाण्या-येण्याकरीता उपविभागीय अधिकारी, रामटेक यांनी प्रस्तावीत केले आहे.

करीता दिनांक २२/११/२०२१ च्या आदेशात बदल करुन उपविभागीय अधिकारी, रामटेक यांनी प्रस्तावीत केल्याप्रमाणे लेवल क्रॉसिंग गेट नं. ५५९ किमी १११/१२-१४ बंद ठेवुन गहुहिवारा चार – मार्गे कन्हानला येणारी जडवाहनांची वाहतूक बंद करुन जबलपूर महामार्गाने (टोल नाका रस्तयाने ) जड वाहनांची जाण्या-येण्याकरीता वाहतूक वळविण्यात यावी तथापि सदर गावातुन फक्त लहान वाहने जाण्या-येण्याकरीता गहुहिवरा चाचेर मार्गाने वाहतूक वळविण्यास हरकत नाही. जिल्हाधिकारी (आर. विमला) जिल्हादंडाधिकारी नागपूर यांच्याद्वारे सुधारित निर्णय घेण्यात आला आहे.

news ब्युरो, कन्हान-नागपूर

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या