उदापूर मध्ये नळाचा पाणी गायप
ब्रम्हापुरी उदापूर ग्रामपंचायत सरपंचाचा गावात अंधार पण बाहेर दंडार
ब्रह्मपुरी शहराला लागून असलेल्या ग्रामपंचायत उदापूर ची लोकसंख्या ३०० हजार च्या जवळपास आहे. उदापूर गावात सध्या स्थित २५,२६ हातपंप आहेत २०१३-२०१४ मध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत नळ योजना करण्यात आली यासाठी शासनाने ४९ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले. हि योजना २०१४ मध्ये पूर्ण होऊन लोकार्तीत झाली.
याच प्रमाणे उदापूर चे हनुमान मंदिर परिसरात सौर उर्जेवर चालणारी सार्वजनिक नळ योजना ५ लाख रुपयाची कार्योन्वीत करण्यात आली कुटुंब संख्या वाढली, नळ कनेक्शन वाढले, ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढले परंतु ग्रामपंचायत ने पाण्याच्या प्रश्नाकडे आतापर्यंत लक्ष दिले नाही. त्यामूळे हनुमान मंदिर परिसरातील सौर उर्जेवर चालणारी सार्वजनिक नळ योजना मार्च २०२१ पासून पूर्णपणे बंद पडली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील नळ योजना तिन ते चार दिवस या ना त्या कारणाने विस्कळीत होत असल्याने नळाचा पाणीच गायप झाल्याने याची सर्वाधिक झळ शिवनगर वासियांना पोहचत आहे. उन्हाळ्याची वेळ असल्याने सर्वांना पाण्याची गरज आहे मात्र ग्रामपंचायतचे सरपंच गावाकडे लक्ष न देता ब्रह्मपुरी तालुका सरपंच संघटनेचा अध्यक्ष ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष असे पद मिळवून गावात अंधार आणि बाहेर दंडार शाबासकी मिळवीत आहे. ग्रामसेवक या कडे मुद्दाम पणे दुर्लक्ष करीत आहेत.
उदापूर येथील बहुतांश नागरिक मुके बहिरे आंधळे बनून पाणी समस्यांना तोंड देऊन रात्र दिवस हात पंपाचे हॅण्डल हालवून घाम गाळून पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. आतातरी उदापूर चा सरपंचांनी नाव मोठे लक्षण खोटे सारखे वागू नये पाणी समस्या तात्काल सोडविण्याकडे लक्ष द्यावे अशी उदापूर च्या नागरिकांची मागणी आहे.
राहुल भोयर प्रतिनिधी



0 टिप्पण्या