सुरगाणा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सुरगाणा(नाशिक): भारतीय संविधानाचे जनक शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश आपल्या आचरणातून देणारे शिक्षण व स्वच्छ चारित्र्य या बाबतीत आग्रही असणारे विश्वभुषण,भारतरत्न, महाविद्वान ,महानायक ,अर्थशास्त्रज्ञ महान इतिहासकार, संविधान निर्माते क्रांतीसुर्य ,युगपुरुष, परमपूज्य, बोधिसत्व,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम करून,होळी चौकात भाजपा युवा मोर्चा तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.
शहरातील होळी चौकात भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक मा श्री सचिन महाले, पोलीस निरीक्षक (सुरगाणा) श्री कोळी साहेब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री रामदास महाले, नगरसेविका श्रीमती मालती खांडवी,नगरसेविका श्रीमती रंजना लहरे, नगरसेवक, श्री संजय पवार, डॉ. विनोद महाले ,श्री भावडू चौधरी ,श्री कैलास थोरात , श्री संतोष लाडे, श्री दिपक पगारे,श्री कैलास सूर्यवंशी ,श्री विजय बागुल ,श्री बप्पी महाले ,श्री श्याम पगारे ,श्री रामदास दळवी यावेळी समस्त नागरिक मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते
प्रतिनिधी: गणेश गाडेकर सुरगाणा-नाशिक


0 टिप्पण्या