शासनाचे नियम धाब्यावर बसवून गावालगतच विटा बनविण्याचे काम
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप व रब्बी हंगामानंतर शेतात विटा व्यवसाय हंगाम मोठया प्रमाणात केल्या जातो. परंतु विटा व्यवसायिक शासनाचे नियम धाब्यावर बसवून अनेक ठिकाणी गावालगतच विटा बनविण्याचे काम करीत असल्याने त्याचा भर उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होत आहे. ग्रामीण भागात तसेच शहरात विटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. विटा व्यवसायामुळे ग्रामीण तसेच शहरातील अनेक मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो. विटा बनविण्यासाठी शासनाचे काही नियम आहेत .
विटा व्यावसायिक शासनाची परवानगी घेऊन विटा बनवण्याचे काम करीत असतात . परंतु ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विटा ठेकेदार आपल्या सोईनुसारसर्व नियम धाब्यावर बसवून गावाला लागूनच विटा बनवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होते. परिणामी उन्हाळ्यात याचा नाहक त्रास गावाशेजारील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून गावालगत विटा बनवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे .
राहुल भोयर प्रतिनिधी


0 टिप्पण्या