डॉ.शैलेंद्र देव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील नर्सरी युनिट ला भेट
ब्रम्हपुरी :- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देव यांनी नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे विद्यापीठाच्या कमवा व शिका तसेच क्रांतिवीर बाबुराव शेडमाके कमवा व शिका या योजनेअंतर्गत महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या नर्सरी युनिट, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प अशा विविध कामांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी हितगुज साधली आणि पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे आणि कमवा व शिका याजनेतील विद्यार्थी उपस्थित होते.
राहूल भोयर प्रतिनिधी


0 टिप्पण्या