Advertisement

महा-ई-सेवा कॅम्पला नागरिकांचा ऊस्फूर्त प्रतिसाद

महा-ई-सेवा कॅम्पला नागरिकांचा ऊस्फूर्त प्रतिसाद

स्वयंभू फाउंडेशनचा उत्कृष्ट उपक्रम

वडगाव मावळ(पुणे) स्वयंभू फाउंडेशन आयोजित व पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध योजनांचा अल्पदरात नागरिकांसाठी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.या कॅम्प मध्ये आतापर्यंत ४५० ते ५०० नागरिकांनी लाभ घेतला आहे. भव्य महा ई-सेवा कॅम्प हा सुदवडी, सुदुंबरे, जांभवडे, इंदोरी,जाधववाडी या गावांमध्ये  गेल्या ११ मार्चपासून झाला असुन पुढील कालावधीत तो बधलवाडी, मेंडेवाडी, परीटवाडी, नवलाख उंबरे येथे होणार असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वयंभु फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. कॅम्प मध्ये अल्पदरात नागरिकांसाठी  आवश्यक असणारे  पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स,पासपोर्ट, शॉप ॲक्ट लायसन, मतदान कार्ड, फूड लायसन्स अशा अल्प दरात  उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

प्रतिनिधी:- सुखदेव जाधव (मावळ/पुणे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या