डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांन वर कठोर कार्यवाही करण्याची मागणी
कन्हान शहर विकास मंच पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षका मार्फत गृहमंत्रीना निवेदन
कन्हान – मोर्शी तालुक्यात रिध्दपुर गावात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केल्याचा जाहिर निषेधार्थ कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्फत गृहमंत्री ना निवेदन पाठवुन तात्काळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना अटक करुन त्यांचा वर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे .
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील रिध्दपुर गावात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही समाज कंटकांनी विटंबना केली आहे . या प्रकरणा नंतर नागरिकांन मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने कन्हान येथे याचा निषेधार्थ कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन त्यांचा मार्फत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचे निवेदन पाठवुन तात्काळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना अटक करुन त्यांचा वर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ॠ बावनकर , सचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , सदस्य हर्ष पाटील , शाहरुख खान , चंदन मेश्राम सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी: ऋषभ बावनकर,कन्हान-नागपूर


0 टिप्पण्या