Advertisement

वराळे गावात ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन

वराळे गावात ७५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन

वडगाव मावळ:जिल्हा परिषद फंडातून सभापती कृषी व पशुसंवर्धन बाबुराव वायकर यांनी
७५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच विविध विकासकामांचा भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार सुनील शेळके यांच्या शुभहस्ते तसेच तालुकाध्यक्ष बबन भेगडे, सभापती बबन भोंगाडे, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

यावेळी वराळे गावातील भैरवनाथ भजनी मंडळ,इंद्रायणी भजनी मंडळ,शिवकॉलनी भजनी मंडळ यांना भजनाचे साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब भानुसघरे,बाळासाहेब गायकवाड, तळेगाव नगर परिषदेचे नगरसेवक संदीप शेळके,प्रवीण काळोखे,शरद भोंगाडे, अजिंक्य टिळे,सचिन मुर्हे,विठ्ठल मोहिते,राम मराठे रामदास मांडेकर,माऊली मराठे बालाजी मित्र मंडळचे अनिल मोहिते,सुयश सांगळे,सुनील दंडेल, अँड अक्षय रौंधळ, भाऊसाहेब ढोरे,सुहास वायकर,वराळे गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,आजी-माजी पदाधिकारी आदि उपस्थित होते.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव,वडगाव मावळ-पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या