मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी गणेश खांडगे यांची निवड
वडगाव मावळ(पुणे) मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी गणेश खांडगे यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही निवड जाहीर केली.मावळ तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष बबन भेगडे यांच्या पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा सुपूर्त केला होता.
२५ वर्षानंतर राष्ट्रवादीच्या हाती सत्ता आल्यानंतर विकासकामांना उधाण आल्याचे दिसून येते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने तालुका अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल याची जोरदार चर्चा चालू होती शेवटी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वरिष्ठ उपाध्यक्ष असलेले गणेश खांडगे यांच्या नावाचा शिक्कामोर्तब करण्यात आला.
गेल्या ३० वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करत असून त्यांच्या निष्ठेला यश मिळाले यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली.
गणेश खांडगे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात. तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी कार्य केले त्याचप्रमाणे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष,इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या नियामक मंडळावर संचालक म्हणून खांडगे कार्यरत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी नियुक्ती पत्रात असे म्हटले आहे की आपली राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेली सामाजिक बांधिलकी आणि आत्तापर्यंत आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची नोंद घेऊन आपली तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम आपणास सर्वांच्या सहकार्याने करावयाची आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न राहतील असा मला विश्वास आहे असे गारटकर म्हणाले.
सुखदेव जाधव (मावळ/पुणे)
0 टिप्पण्या