नवलाखउंब्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांना २०१९-२० चा पुणे जिल्हा परिषद यांचा वतीने आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान
वडगाव मावळ(पुणे) नवलाख उम्ब्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांना पुणे जिल्हा परिषद 2019 20 आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
गावातील लोकांच्या समस्या विविध विकास कामे, सामाजिक बांधिलकी जपत विविध कंपन्यांमधून सी एस आर फंडांचे ग्रामपंचायत हद्दीमध्ये विविध कामे मार्गी लावण्यात आली त्याचप्रमाणे बंदिस्त गटार योजना, समाज मंदिर, वाड्या वस्तीमध्ये लाईट , अल्पसंख्यांक व मागासवर्गीय नागरिकांसाठी विविध योजना, विविध फंडांचा पाठपुरावा करून विकास कामे करण्यात आली.
त्याचप्रमाणे कर्तव्य तत्परता, कार्यक्षमता, अविश्रांत मेहनत तसेच व्यापक जनसंपर्क यांच्या आधारे व शासनाच्या विविध योजना गाव पातळीवर योग्य प्रकारे राबवल्या आणि ग्रामपंचायत प्रशासनास जास्तीत जास्त पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यास योगदान दिल्याबद्दल त्यांना हा आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वी सरपंच दत्तात्रय पडवळ यांना दि प्राईड ऑफ इंडिया चा भास्कर अवार्ड २०१९ पुरस्काराने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले होते.
दत्तात्रेय पडवळ यांनी गावचे सरपंच व नवलाख उंबरे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावली असून त्या कामगिरीला यश संपादन झाले आहे.
प्रतिनिधी: सुखदेव जाधव
0 टिप्पण्या