स्वीकृत नगरसेवक पदासाठी शमीद खाटीक यांच्या नावाची जोरदार चर्चा
सुरगाणा/नाशिक: समाजसेवा करण्यासाठी समाजात क्वीनचित लोक असतात, काही आपल्या कामाने तर काही स्वभावाने लोकांमध्ये हसून खेळून समाजकार्य करत असतात.
परंतु अशा समाजसेवकाला सर्वांसमवेत काम करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी निर्माण होतात, अशा समाज कार्यासाठी समाजात वावरत असलेल्या लोकांची जास्त प्रमाणात गरज भासत असते, म्हणूनच अशा समाज सेवकाला शोधण्यासाठी नगर पंचायत स्विकृत लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत राज व्यवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थामधून काही कार्यकर्त्यांना संधी देण्याची तरतूद असून, याचाच आधार घेऊन सुरगाणा नगर पंचायतीमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.
मागील आठवड्यात ही प्रक्रिया राबवली, परंतु यासाठी इच्छुक उमेदवार या प्रक्रियेत खरे उतरले नाहीत, म्हणून ही प्रक्रिया रद्दबातल ठरविण्यात आली. तसेच या पदासाठी पुन्हा हि प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी शमीद खाटीक यांची जोरदार चर्चा सुरू असून, सुरगाणा नगर पंचायत मध्ये या ओळखीच्या चेहऱ्याला संधी मिळेल का? हे पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
कारण शमीद खाटीक यांचा परिचय लोकांना चांगलाच ठाऊक असून, सुरगाणा नगर पंचायतीच्या कारभारात सहभागी झाल्यास आश्चर्य वाटायला नको? अनेक सामाजिक कार्यात शमीद खाटीक यांचा सहभाग आहे. अशा व्यक्तिमत्व व्यक्तीस नगर पंचायतीत स्वीकृत नगर सेवक पदी संधी मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी- किशोर जाधव, सुरगाणा/नाशिक
0 टिप्पण्या