शिवजयंती निमित्त शिवकालीन मर्दानी खेळाचे जिल्हास्तरीय स्पर्धा आकुर्डी येथे संपन्न
वडगाव मावळ (पुणे) आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल शिवजयतीनिमित्त शिवकालीन मर्दानी खेळाचे जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धसाठी देहुगावं, चिखली, चिंचवड, वडगाव मावळ, जाधववाडी, चऱ्होली, कान्हेगाव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वडगाव मावळ संघाने पटकावला, द्वित्तीय क्रमांक अभंग स्पोर्ट अकादमी देहूगाव व तृतीय क्रमांक जाधववाडी,चऱ्होली या दोन्ही संघाने पटकावला.
यावेळी समाजसेवक नानासाहेब काळभोर, क्रेबीज इंटरनॅशनल स्कूलचे संचालक राम रैना,समाजसेविका शीतल वर्णेकर,प्रांत पोलीस राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष गोपाल बिरारी, राष्ट्रीय सैनिक संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले, श्रीया गोजमगुंडे, प्रांत पोलीस संघ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संदीप पोलकम,महाराष्ट्र राज्य मर्दानी खेळ असोसिएशनचे अध्यक्ष संजय बनसोडे, सचिव किरण अडागळे, खेळाचे पंच म्हणून स्मिता धिवार मॅडम, अर्चना आडकर मॅडम, सुदर्शन सूर्यवंशी, रविराज चखाले, चेतन नवले, अंजली बर्वे, गणेश चखाले, श्रेया दंडे,रूपाली चखाले आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी: सुखदेव जाधव,मावळ-पुणे
0 टिप्पण्या