कन्हान-पिपरी नगराध्यक्ष यांच्या घरी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीने केली दमदाटी व दिली जीवे मारण्याची धमकी: आरोपी गजाआड
कन्हान-पिपरी नगराध्यक्षा करुणा आष्टनकर यांच्या घरी जाऊन गुंड प्रवृत्तीच्या इसमांनी जाऊन केली शिवीगाळ,जीवे मारण्याची दिली धमकी, धरम नगर कन्हान, निवासी भयभीत चे वातावरण निर्माण झाले असता. कन्हान-शहर अध्यक्षा जर सुरक्षित नाही तर साधारण नागरिकांचे काय?
कन्हान: कन्हान-पिपरी नगर परिषद अंतर्गत निंदनीय घटना स्थानिक, गुंड प्रवृतीच्या इसमांनी नगरध्यक्षा करुणा आष्टनकर यांच्या घरी जाऊन चाकू दाखून केली शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी दिली असता. शहरात खालबलीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही निंदनीय घटना दिनांक ०९/०३/२०२२ ला सायंकाळी घटली असाता. नगराध्यक्ष त्यांच्या घरी, त्यांच्या दोन मुली होत्या. व त्यांना दमदाटी करून आरोपीने भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्षा ह्या काही कारणास्तव बाहेर गेली असता. त्या ताबळतोब घरी आल्या व मुली कडून माहिती सविस्तर जाणून घेतली.
कन्हान पोलीस ठाण्यात तक्रार करून आरोपीला अटक करण्यात आले. आरोपी सानू सिद्धिकी ह्या इसमाने नगरध्यक्षा यांच्या मुलीला रात्री दिनांक ०९/०३/२०२२ धमकी दिली कि मी तुझ्या आईला बघून घेईन,असे बोलुन दमदाटी करीत होता.
नगरध्यक्षा यांच्या संगीतल्यानी रोपीने असे प्रकार दिवसात दोन केले होते, म्हणून मला, माझ्या दोन मुलीला व पतीला काही झाल्यास त्याची जबाबदारी आरोपीची राहील. असे नगरअध्यक्षा यांनी सांगितले. आरोपी हा मुळता गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर २००३ पासून गंभीर असे गुन्हे दखल आहेत. तरी आरोपीवर त्वरित गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी अशी मागणी कन्हान पोलीस ठाण्यात सादर केली आहे.
असेही म्हंटले जात आहे कि नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झाला असून, कन्हान-पिपरी च्या नगरध्यक्ष प्रथम नागरिक महिला असून ते जर सुरक्षित नाही व त्यांचा परिवार सुरक्षित नाही! म्हणजे कन्हान शहर मध्ये किती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व अवैध धंदे वाढले असतील हे स्पष्ट दिसत आहे. कन्हान शहर च्या नगराध्यक्षा सुरक्षित नाही तर कन्हान शहर चे स्थनिक निवासी/ नागरिक/मुली कश्या सुक्षित असणार असा प्रशन मोठ्या प्रमाणातून जनतेतून विचारले जात आहे. ही अनुचित बाब घडली असता कन्हान शहर मध्ये भीतीचे व खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिनियम भारतीय दंड सहिता १८६० कलम ४४७/५०४/५०६ अंतर्ग आरोपीवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. सदर चौकशी कन्हान पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात येत आहे.
शिवसेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मा. dysp मुख्तार बागवान यांच्याशी चर्चा करून कन्हान शहर ची समस्यावर चर्चा केली. कन्हान मध्ये होत असलेले अवैध धंदे व वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी कठीन कार्यवाही करावी असे शिवसेना शिष्टमंडळ द्वारे चर्चा करून त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्तीथ
वर्धराज पिल्ले (शिवसेना उपजिल्हा प्रमुख,नागपूर-ग्रामीण) करुणा आष्टनकर (कन्हान-पिपरी नगर परिषद नगराध्यक्षा ) डायनल शेंडे (कन्हान-पिपरी नगर परिषद उपाध्यक्ष) राजू भोस्कर (तालुका प्रमुख-पारशिवनी,शिवसेना)नगर सेवक अनिल ठाकरे, नगर सेविका मोनिका पौनिकार, नंदा घोगले, मनीषा चिखले,छोटू राणे,महेश खवले,समीर मेश्राम,सुनील पिल्ले,लता लुन्ढेरे, दामोदर बंड, प्रदीप गायकवाड,चिंटू वाकुडकर,समशेर पुरवले,सैलेश दिवे, उमेश पौनीकर,भारत पगारे,अर्जुन पात्रे व समस्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
0 टिप्पण्या