Advertisement

मराठी राजभाषा दिनानिमित्त कला-वाणिज्य-बीबीए महाविद्यालयामध्ये कवी संमेलन उत्साहात संपन्न

मराठी राजभाषा दिनानिमित्त कला,वाणिज्य, बी.बी.ए.महाविद्यालयामध्ये कवी संमेलन उत्साहात संपन्न

वडगाव मावळ(पुणे)- श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला,वाणिज्य, बी.बी.ए. महाविद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी संमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी प्रसिद्ध कवी सुमित गुणवंत,माधुरी वानखेडे, जित्या जाली, शेखर चोरगे, तुषार घोरपडे,विक्रांत शेळके आदी मान्यवर उपस्थितीत होते.

कवी संमेलनाच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक, प्रेम, स्पर्धा परीक्षा, आई-वडील, शिक्षक अशा विविध विषयावर कवींनी आपल्या सुमधुर आवाजात कविता सादर केल्या सर्व विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. कवींचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मामासाहेब खांडगे पतसंस्थेचे संचालक राज खांडभोर, प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सर्व कवींचे कौतुक केले आणि हे कवी महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होतील असे  राज खांडभोर यांनी सांगितले.

कार्यक्रम प्रसंगी मराठी विभागप्रमुख प्रा.अशोक गायकवाड, प्रा.महादेव वाघमारे, प्रा.अनिल कोद्रे, डॉ. शीतल दुर्गाडे, प्रा. शीतल शिंदे, प्रा. गजानन वडुरकर, प्रा. संतोष शिंदे, प्रा. योगेश जाधव, प्रा.सुखदेव जाधव, प्रा.डॉ. जया धावरे, प्रा. स्वप्नील ठोकळे, प्रा.अशोक कोकाळे, अक्षय अवतडे सर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी चंदनशिवे  तर आभार प्रदर्शन प्रा. ज्योती रणदिवे यांनी केले.

प्रतिनिधी: सुखदेव जाधव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या