म्हसा येथील काही महीन्यापुवीॅ दुकाने फोडणारे चार जण तेथील एकाचे चोराच्या आवळल्या मुसक्या ,तर तीन जणांची नावे समजली
मुरबाड तालुक्यातील म्हसा बाजारातील
दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवज चोरून लंपास करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील एकाला मुरबाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्हातील चोऱ्यांची मोठी उकल होण्याची शक्यता निर्माण झाली असून अवघ्या २ महिन्यांत चोरट्याचा शोध घेणाऱ्या मुरबाड पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कामगीरीचे मुरबाड तालुक्यात कौतुक होत आहे.
११ डिसेंबर २०२१ रोजी मुरबाड तालुक्यातील म्हसा बाजारपेठे मधील कपड्याची, मोबाईलची, मेडिकलची सुमारे ६ दुकाने फोडून रोख रक्कमेसह ऐवज लंपास केला होता. चोरट्यांनी मागे कोणताही पुरावा ठेवला नव्हता. मात्र मुरबाड पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व चोरीची पद्धत अशी अनेक प्रकारच्या माहितीचे अवलोकन करून आंतर जिल्हा ठाणे रायगड जिल्ह्यात चोऱ्या करणाऱ्या एकास कोणताही धागा दोरा नसताना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
ही कारवाई मुरबाड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एस. व्ही.शेंडे, सहायक पो. उप निरी. पी.जे. गुंड,पोलीस नाईक रामदास शिंदे, जयवंत मोरे, निचिते यांनी या आंतर राज्य टोळीतील चोराच्या मोठया शिताफीने सापळा रचून मुसक्या आवळल्या.
या टोळीतील अटक चोरट्याच्या साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू- पो. निरी. प्रसाद पांढरे ,ठाणे रायगड जिल्ह्यात या आंतर जिल्हा टोळीतील चोराला मुरबाड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपासात त्याच्या साथीदारांचा शोध लागेल. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात गेल्या ६ महिन्यापासून सुरू असणाऱ्या रिंग राउंड पेट्रोलिंग व गुन्हे प्रतिबंधक गस्ती पथकाच्या कामगीरीला मोठे यश आले आहे.
प्रतिनिधी: राजेश भांगे मुरबाड-ठाणे


0 टिप्पण्या